Khed: दारूभट्टी लावल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीन ने खेड तालुक्यातील(Khed) रासेगाव येथे एका दारूभट्टीवर सोमवारी (दि. 15) कारवाई केली. यामध्ये दारूभट्टी लावल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधीर दांगट यांनी चाकण पोलीस ठाण्यात(Khed) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रासेगाव येथील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune : टॉवर लाईनची वीज वाहिनी तुटल्याने पिरंगुट व हिंजवडी उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील रासेगाव येथे ओढ्यामध्ये एका महिलेने दारूभट्टी लावली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास दारू भट्टीवर छापा मारला. या छाप्यामध्ये पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीचे दोन हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=NFtTw2DPu6I&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.