PCMC : शहरातील नालेसफाईला सुरूवात 

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या आराेग्य विभागाच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालय ( PCMC) परिसरातील नालेसफाईला सुरूवात करण्यात आल्याची माहिती आराेग्य विभागाचे सहायत आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 100 किलोमीटर अंतराचे लहान-माेठे असे 148 नाले आहेत. पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्व नाले स्वच्छ केले जातात. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. पाऊस सुरू झाल्यास काम करता येत नाही. त्यामुळे उन्हाळ्यातच हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. शहरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी यांत्रिक पद्धतीने 31 मे पूर्वी साफ करावेत असा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आराेग्य विभागाला 22 मार्चला दिला हाेता. त्यानुसार शुक्रवारपासून आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात नालेसफाईला सुरूवात झाली आहे.

Pimpri : यश भाग्याच्या जोरावर नव्हे कष्टाच्या जोरावर प्राप्त होते – अतिरिक्त आयुक्त जगताप

आठही क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने सफाई केली जात आहे. ज्याठिकाणी अरुंद नाले आहेत, तिथे मशिन जात नाही. अशा नाल्यांमध्ये सुरक्षेची सर्व साधने वापरून मनुष्यबळाद्वारे सफाई ( PCMC) करण्यात येत आहेत. सफाई पूर्वीचे आणि सफाई नंतरचे छायाचित्रही घेण्यात येत आहे. तसेच नालेसफाई व्यवस्थित हाेते की नाही? याची आपण स्वतः पाहणी करणार आहाेत.

यशवंत डांगे, सहायक आयुक्त, आरोग्य विभाग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.