Pimpri : यश भाग्याच्या जोरावर नव्हे कष्टाच्या जोरावर प्राप्त होते – अतिरिक्त आयुक्त जगताप

एमपीसी न्यूज –  स्पर्धा परिक्षांची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना (Pimpri) अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींवर मात करून दिवसरात्र अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न अनेकांनी पाहिलेले असते. हे स्वप्न पुर्ण झाले तरी यशाचा मार्ग न सोडता आणखी प्रगती करण्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. प्रशासनात कार्यरत असताना  वरिष्ठ पदापर्यंत मजल मारण्याची जिद्द अंगी जोपासली पाहिजे. यश हे भाग्याच्या जोरावर नाही तर कष्टाच्या जोरावर प्राप्त होते. महापालिका स्पर्धा परिक्षा केंद्रांमधील विद्यार्थी हे यश संपादन करून शहरासोबत देशाचेही नाव उंचावतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या पर्वाच्या पाचव्या दिवशी महापालिकेच्या स्पर्धा परिक्षा केंद्रांमधील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त तथा प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक उल्हास जगताप बोलत होते.

Pune : टॉवर लाईनची वीज वाहिनी तुटल्याने पिरंगुट व हिंजवडी उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, निवृत्त परिक्षेत्र वन अधिकारी तसेच सावित्रीबाई फुले अकादमी वाकडचे संचालक रंगनाथ नाईकडे, ग्रंथालय प्रमुख कल्पना जाधव, ग्रंथपाल प्रविण चाबुकस्वार, वर्षा जाधव, राजु मोहन, वैशाली थोरात, कांचन कोपर्डे, राजेंद्र आंभेरे, लिपीक संदेश आगळे, ऋषिकेश भिसे तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन्मान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भोसरी स्पर्धा परिक्षा केंद्रातील अमित जाधव, स्वप्नील कचरे, विकास जाधव, घुटे प्रशांत, जांभळे राहुल, कामले रणजित, धिरज बागल, आकाश सरवदे, संतोष भोसले, जयंत जाधव, भगवान सपकाळ, निगडी यमुनानगर स्पर्धा परिक्षा केंद्रातील आकाश मनवर, विकास चाळके, चेतन खैरे, लक्ष्मण झोरे, किरण मुंडे, गणेश ठाणेकर, हमुनंत मोकले, प्रशांत शिंगाडे, साईनाथ जाधव, प्रतिक पवार, ओमेश गवळे, मोहसीन शेख, सुनिल मेमाणे, संकेत कस्पटे, तुकाराम सुर्यवंशी, कृष्णाजी चिंचवडे पाटील ,

स्पर्धा परिक्षा केंद्र चिंचवड येथील भगवान मोराळे, शिशीकांत कोळी, सौरभ जगताप, औदुंबर कदम, कुणाल सगर, विजय भोसले, पुजा गिरी, वाघमारे लक्ष्मण, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्पर्धा परिक्षा केंद्र रहाटणी येथील प्राची पाटील, चंद्रशेखर पाटील, अतुल गुरव, व्यंकटेश कोळेकर, अमोल वाघमारे, त्रिवेणी बोळाज, संतोष चेडे, शिवप्रसाद जाधव तसेच शहिद अशोक कामटे स्पर्धा परिक्षा केंद्र सांगवी येथील सज्जन कोळेकर, संभाजी बचुटे, जयभद्र कोळी, उमेश वाघमारे, सोमनाथ सुर्वे, अजय कोतकर, प्रदिप डोंगरे, सुहास लोणकर, समीर मलघे, अनंता पवार, अदिती शेलकडे, अमोल कुंजीर, सोमनाथ चंदनकर, विवेक इंगवले, सोमनाथ आदमिले, राहुल कोरडे या विद्यार्थ्यांचा समावेश (Pimpri) होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.