PCMC TDR : अखेर टीडीआर प्रकरणातील प्रकल्पाच्या बांधकामास स्थगिती

एमपीसी न्यूज –  वाकड येथील भ्रष्टाचाराचे आराेप झालेल्या (PCMC TDR) टीडीआर प्रकरणात अखेर संबंधित बांधकामाला प्रशासनाने स्थगिती आदेश दिला आहे.  पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी विकसकाला दिले आहेत.

महापालिकेतील कथित टीडीआर घोटाळा हिवाळी अधिवेशनापासून गाजत आहे. नियमबाह्य व बेकायदेशीर प्रक्रिया केल्याचा आराेप यामध्ये झाला. वाकड येथील स.न.१२२ येथील विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४ /३८ ट्रक टर्मिनस(काही भाग) व ४/३८A पीएमपी डेपो या आरक्षणासाठी १०,२७४ चौरस मीटर क्षेत्र समावेशक आरक्षणाच्या तरतुदी अंतर्गतविकसित करण्याचा हा प्रकल्प होता. मात्र, या प्रक्रियेवर आक्षेप घेत संबधित विकसक संस्थेला ज्यादा टीडीआर देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होता. त्यामुळे विकासकाला दिलेला टीडीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, आम आदमी यासह विविध सामाजिक संघटनांनी आंदाेलन केले हाेते.

PCMC : शिक्षणाचा जल्लोष पर्व दोनमध्ये फुगेवाडी-बोपखेलचा प्रथम क्रमांक

दरम्यान, शहर अभियंता निकम यांनी संबधित विकसक मे. विलास जावडेकर इन्फिनिटी या संस्थेला पत्र पाठवले. आहे. आयुक्तांनी समावेशक आरक्षणे विकसित करण्याच्या बैठकीत दिलेली मान्यता व करारनामा झालेला आहे. त्यानुसार काम सुरू (PCMC TDR) आहे. परंतु, त्यानंतर 10 जानेवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत थांबवावे, असे निकम यांनी नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.