Pimple Saudagar : हॉटेलमधील कामगाराने केला  अपहार

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये कॅप्टन म्हणून काम (Pimple Saudagar ) करणाऱ्या एका तरुणाने 70 हजार रुपयांचा अपहार केला. ही घटना गुरुवारी (दि. 6) दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील हॉटेल तत्व येथे घडली.

अभिमन्यू संपत विनोदे (वय 25, रा. विनोदे नगर, वाकड) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल रतन प्रामाणिक (वय 23, रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : चिंबळी गावातील दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपळे सौदागर येथे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आरोपी राहुल हा कॅप्टन म्हणून काम करतो. आरोपीकडे फिर्यादी यांनी बँकेतून रक्कम काढण्यासाठी एक धनादेश दिला.

तो धनादेश घेऊन आरोपी बँकेमध्ये गेला. बँकेतून 70 हजार रुपये काढले आणि ते फिर्यादी यांच्याकडे न देता त्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत (Pimple Saudagar ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.