Pimpri : भाजपचे अमित गोरखे यांनी घेतली अजित पवार यांची भेट; राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रमुख अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी (Pimpri) जात भेट घेतली. पिंपरीतून निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेल्या गोरखे यांनी अजितदादांची भेट घेतल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Pune : भाजप नेते नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे आंदोलन

अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकामध्ये सहभागी झाले. त्यामुळे शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक सोबत आले आहेत.

अमित गोरखे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही गोरखे यांनी भूषविले आहे.

भाजपने त्यांची पिंपरी विधानसभेच्या प्रमुखपदी नियुक्तीही केली आहे. गोरखे यांच्याकडे पिंपरीचे भाजपचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. 2019 च्या निवडणुकीवेळी गोरखे तीव्र इच्छुक होते.

पण, भाजप-शिवसेना युतीमध्ये जागा शिवसेनेला गेल्याने गोरखे यांना थांबावे लागले होते.

महाविकास आघाडी झाल्यानंतर गोरखे यांनी पुन्हा पिंपरीतून जोरदार तयारी सुरु केली होती. पण, अजित पवारांचा गट सरकारसोबत आला.

त्यामुळे भाजप आणि पवार गटात पिंपरी विधानसभेच्या जागेवरुन रस्सीखेच होवू शकते. उच्चशिक्षित, शांत, संयमी असलेल्या गोरखे यांना उमेदवारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही राहू शकतात.

दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत. त्यातच फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असलेल्या गोरखे यांनी अजितदादांची भेट घेतल्याने शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अजित पवार यांचे अभिनंदन केले. शहरातील काही प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांना निवेदन देवून चर्चा केली. या भेटीकडे राजकीय चष्म्यातुन पाहू नये असे गोरखे (Pimpri) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.