India :भारताचा वेस्ट इंडिज दौरा आजपासून सुरु; यशस्वी, ऋतुराजला संधी?

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा आजपासून (दि 12 ) सुरु होत  आहे. यावेळी भारतीय (India) संघामध्ये युवा व अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्र असल्याने कुणाला संधी मिळते हे बघण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहते अत्यंत उत्सुक आहेत. सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार असून संध्याकाळी 7.30  वाजता दिवसाची सुरुवात होईल व  जिओ सिनेमा आणि दूरदर्शन (DD) सामन्यांचे थेट प्रेक्षापण करतील.

मंगळवारी (दि 11 ) दिलेल्या मुलाखतीत कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले होते की यशस्वी जैस्वाल याला सलामी फलंदाजीमध्ये संधी देण्यात येईल तर शुभमन गिल हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

ऋतुराज गायकवाड यालाही संधी मिळू शकते असे त्याने सांगितले.

Pimpri : भाजपचे अमित गोरखे यांनी घेतली अजित पवार यांची भेट; राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण

संघामध्ये विराट कोहली, अजिंक्य राहणे यासारखे अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत व वेस्ट इंडिज चा संघ सध्या ‘बॅड पॅच’ मधून जात असून कर्णधार रोहित शर्माकडे पुढील येणाऱ्या ‘मोठ्या कसोट्यांसाठी’ या मालिकेमध्ये संघाच्या संयोजनामध्ये प्रयोग करण्याची संधी आहे.

भलेही या मालिकेमध्ये दोनच सामने असले तरीही डब्ल्यूटीसीनुसार संघाला घेऊन दीर्घकालीन विचार करणे महत्वाचे आहे.

संघामध्ये चांगले संतुलन व पर्याय असणे महत्वाचे असून दुखापतींचे अडथळे नक्कीच दूर होऊ शकतात हे आपण आजवरच्या क्रीडा इतिहासात बघत आलेलो आहोत.

संघामध्ये खेळाडूंपेक्षा त्यांचा ‘प्रोफाइल’ला महत्व देणे हा निवडकर्त्यांचा ध्येय दिसत असून अश्या मालिकेमध्येच योग्य प्रोफाईलच्या खेळाडूंना विकसित करण्याचा प्रयत्न भारतीय संघ यावेळी करेल अशी अपेक्षा  (India) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.