U19Wc : क्रिकेट विश्वचषक विजयाची भारताला प्रतिक्षाच; ऑस्ट्रेलियाकडून 79 धावांनी पराभव

एमपीसी न्यूज- दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षाखालील पुरुषांच्या (U19Wc) क्रिकेट विश्वचषकात भारताचा ऑस्ट्रेलिया कडून 79 धावांनी पराभव झाला असून त्यामुळे भारताला विश्वचषक विजयासाठी अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे.

अंतिम सामन्यापर्यंत सलग विजय मिळवत दिमाखात प्रवेश करणार्‍या भारतीय संघाला अंतिम सामन्यातील दडपण हाताळता आले नाही. प्रथम फलंदाजी करणार्‍या ऑस्ट्रेलिया च्या संघाने दिलेल्या 253 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 43.5 षटकांत 174 धावातच आटोपला. या विजयासह 19 वर्षाखालील ऑस्ट्रेलियन संघाने चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली.

Dighi : इन्स्टंट लोन ॲप वरील कर्ज भरण्यासाठी पठ्ठ्याने स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव

तर वरीष्ठ पुरुष भारतीय संघाच्या पावलावर पाऊल ठेवत कनिष्ठ संघानेही विश्वचषक (U19Wc) गमावला. भारताच्या वतीने आदर्श सिंग 47 धावा, मृगन 42 यांनी भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना अपयश आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.