Talegaon Dabhade : लवकरच भारत जगात अव्वल स्थानी दिसेल – उदय निरगुडकर

एमपीसी न्यूज – भारतातील तरूण संशोधकांमुळे नविन तंत्रज्ञान (Talegaon Dabhade) विकसित होत आहे. त्यामुळे भारत देश हा जगात अव्वल स्थानी आपल्याला दिसेल असे भाकित जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळ भुषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफताना श्री निरगुडकर हे बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार डाॅ शैलेश गुजर हे होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा,संचालक युवराज काकडे,संदिप काकडे,विलास काळोखे,माजी नगराध्यक्ष ॲड रविंद्र दाभाडे,निरुपा कानिटकर,प्राचार्य डॉ संभाजी मलघे, राजश्री म्हस्के, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, माजी नगरसेवक संतोष भेगडे, भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचे काँग्रेसने मागविले अर्ज

भारतातील तरूणामध्ये संगणक शिक्षणाची सर्वाधिक आवड असुन नवनवीन संशोधन करण्यासाठी हा तरूणवर्ग धडपडत आहे.असे सांगून  निरगुडकर पुढे म्हणाले की,याच तरुणांकडून जगाला उपयुक्त असे संशोधन निर्माण होईल.भारतातील रेल्वे,रस्ते,आणी इतर भौतिक गोष्टी ही वेगाने बदलत असुन त्यातुन सामान्य माणसाला उपयुक्त अशा सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत.

जगातील भारत हे तरुणांची संख्या सर्वात जास्त असलेला (Talegaon Dabhade) जगातील मोठे राष्ट्र आहे. याच तरुणांकडून महत्वाची संशोधने होऊन भारत हा जगातील एक महासत्ता देश होईल अशी सर्व जगाला आशा वाटते आहे.

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे खजिनदार शैलेशभाई शहा यांना इंद्रायणी विद्या मंदिर पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांकडून गौरविण्यात आले.

युवराज काकडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सत्यजित खांडगे आणि शिल्पा देशपांडे यांनी केले.संपुर्ण व्याख्यानमालेचे यशस्वी नियोजन करण्यासाठी प्राचार्य डॉ संभाजी मलघे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.