Kiwale : पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवरील शास्तीकराचे (Kiwale) ओझे कमी केले. सर्वसामान्य नागरिकांचे 650 कोटी माफ केले. आता शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला जाईल. कोणालाही बेघर करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसंकल्प अभियान सभा किवळे येथील मुकाई चौकात शनिवारी पार पडली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विजय शिवतारे, इरफान सय्यद, शीतल म्हात्रे, भगवान वाल्हेकर, निलेश तरस यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत शिवसंकल्प अभियानाची सुरुवात केली. आपले सरकार आल्याने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो, स्वागत करतात. दीड वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही. महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. डबल इंजिनचे सरकार आहे. युती म्हणून आम्ही मते मागितली होती. सर्वसामान्य लोकांनी युती म्हणून मतदान केले होते.

पण, निकाल आल्यानंतर काही लोकांनी विचारला तिलांजली दिली. काही लोक जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. पण, आपण विकास करत आहोत. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेल्याचे काही लोक म्हणतात. पण, आपले राज्य उद्योगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. गतिमान पद्धतीने हे सरकार चालले आहे. लोक, जनहिताचे निर्णय घेतले.

बाळासाहेबांचे विचार आमच्यासोबत असल्याने लोक आमच्याकडे येत आहेत. विरोधकांच्या (Kiwale) पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विनाकारण आरोप करत असतात. त्यांना कामामधून उत्तर देतो. अनेक लोकांची साफसफाई केली जाईल. शिवसेना, धनुष्यबाण, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी निर्णय घेतला. मला कोणताही स्वार्थ नाही. गहाण ठेवलेला धनुष्यबाण वाचविला. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढया पुरते माझे काम नाही. संपूर्ण महाराष्ट्र माझा परिवार आहे. राज्य सरकारला केंद्राचे पाठबळ मिळते. पाठविलेले प्रस्ताव तत्काळ मान्य होतात, एक रुपयाही कट होत नाही. दिल्लीला दहा जनपथला मुजरा करण्यासाठी जात नाही, निधी, प्रकल्प आणण्यासाठी दिल्लीला जातो, असेही ते म्हणाले.

Talegaon Dabhade : लवकरच भारत जगात अव्वल स्थानी दिसेल – उदय निरगुडकर

खासदार बारणे म्हणाले की, शहरातील शास्ती कराचा प्रश्न सोडवून सर्वसामान्य लोकांना दिलासा दिला. शहरातील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न प्रलंबित असून तो सोडवावा. उगमापासून इंद्रायणी, पवना नदी स्वच्छ करण्याचा संकल्प केला. या कामाला गती मिळावी. पुणे ते लोणावळा रेल्वेचा तिसरा आणि चौथा मार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.