Today’s Horoscope 07 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 07 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 07.01.2024.

शुभाशुभ विचार- विशाखा वर्ज्य दिवस.

आज विशेष – सफला एकादशी.

राहू काळ – संध्याकाळी 4.30  ते  6.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – विशाखा 22.08  पर्यंत नंतर अनुराधा.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————–

मेष – ( शुभ रंग – क्रीम)

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. भागीदारी व्यवसायात संशयाचे वातावरण राहील. शब्दांचा वापर गरजेपेक्षा जास्त नको. डोके शांत ठेवून ड्रायव्हिंग करा.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

नोकरी धंद्यात उत्साहाचे वातावरण राहील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. वैवाहिक जीवनातील गोडवा वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज आनंदी दिवस आहे.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

नोकरदारांवर कामाचा ताण वाढणार आहे. कार्यक्षेत्रात मानसिक संतुलन डळमळीत करणाऱ्या काही घटना घडतील. आज तुम्हाला विश्रांतीची ही गरज भासेल.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती पाहून पालक समाधानी असतील. मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरविले जातील. आज काही हौशी मंडळी सहकुटुंब मौज मजेस प्राधान्य देतील.

सिंह – ( शुभ रंग – गुलाबी)

आज तुम्हाला काही कौटुंबिक प्रश्नात लक्ष घालावे लागेल. गृहिणींना गृह उद्योगातून चांगली मिळकत होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मान  मोडून अभ्यास करावा लागेल.

कन्या – ( शुभ रंग- क्रीम)

आज तुम्हाला एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल. सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील घराबाहेर वाद टाळा.

तूळ – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज आनंदी व उत्साही दिवस असून तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. आज बोलताना मात्र शब्द जपून वापरायला हवेत. अतिस्पष्ट वक्तेपणामुळे काही चांगली नाती दुरावण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – ( शुभ रंग – पिस्ता)

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. अहंकारास मात्र थारा देऊ नका. आज वैवाहिक जीवनातील मतभेदही फार ताणू नका.

धनु – (शुभ रंग- राखाडी)

आज काही अत्यावश्यक देणी चुकवावीच लागतील. जमाखर्चाचा तराजू समतोल ठेवण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करावे लागतील. दूरच्या प्रवासात सावध राहा.

मकर- ( शुभ रंग – राखाडी)

पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ पदरात पडेल. मित्रमंडळीत तुमच्या शब्दाला मान राहील. आज मित्रांनी केलेली स्तुती फार मनावर घेऊ नका. छान दिवस.

कुंभ – (शुभ रंग- निळा)

कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. उच्चशिक्षित तरुणांना चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल.

मीन – ( शुभ रंग- सोनेरी)

आज उद्योग व्यवसायात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. अध्यात्मिक मार्गाकडे तुमचा कल वाढेल.

 

 

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.