Chikhali : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ संस्थेतर्फे ज्येष्ठांचा वाढदिवस आणि सत्कार समारंभ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –  ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ, महात्मा फुलेनगर, चिंचवड या सामाजिक (Chikhali) संस्थेत‌र्फे नवनविन उपक्रम राबविले जातात. ज्येष्ठांच्या सुखदुःखात सहभागी होत संस्थेतर्फे प्रत्येक सदस्यांचा, ष्ठ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस मोठया उत्साहात एकत्रित साजरा केला जातो.

या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक निवृत्ती गई,शकुंतला गई,दिलीप चिकोडीकर,दिपाली चिकोडीकर,दिलीप राऊत,कमल गायकवाड,दिनेश पाटील यांचा वाढदिवस आणि सत्कार समारंभ विरूंगळा केंद्र, महात्मा फुलेनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे सर्व सभासद, मा. नगरसेविका योगिता नागरगोजे व नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. वाढदिवस असलेला सभासदांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून वाढदिवसाच्या आनंद द्विगुणित करत सर्वांना पुष्प देऊन पेढा भरविला.

संस्थेचे मार्गदर्शक शिवानंद चौगुले यावेळी बोलताना  म्हणाले , ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था आम्ही ज्येष्ठांच्या विरंगुळा , करमणूक आणि ज्येष्ठाना आनंद मिळविण्यासाठी तसेच मनमोकळे करण्यासाठी संस्था स्थापन केली आहे. आणि ज्या काही सरकारी योजना आहेत त्या मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Today’s Horoscope 07 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून लाभलेले योगिता नागरगोजे यांनी ज्येष्ठ नागरिक संघ ही एक सामाजिक संस्था असून संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.तुमच्या संस्थेला कोणतीही मदत, सहकार्य लागत असेल तर मी जबाबदारीने पार पाडेन, माझ्या प्रगतीच्या वाटचालीत ज्येष्ठ नागरिकांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे.

माझ्या सामाजिक कामाची सुरुवात ज्येष्ठांच्या आशीर्वादाने होते, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपल्या संस्थेला माझे योग्य ते सहकार्य असेल असे  योगिता नागरगोजे यांनी  ज्येष्ठ नागरिकांना सांगितले.

ज्येष्ठ नागरिक समाजाचे अनुभव संपन्न महत्वाचे घटक आहेत. आरोग्य सुविधा आणि इतर बाबींमुळे आयुर्मान वाढत चालल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येतही वाढ होत आहे. आजच्या काळातील विकेंद्रीत कुटुंब पध्दतीमुळे संवाद कमी झालेल्या जगात ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन आपल्या समवयस्क लोकांशी संवाद साधण्यासाठी विरंगुळा केंद्रे काळाची गरज असल्याचे मत उपाध्यक्ष विश्वास सोहोनी यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे खजिनदार- नारायण धकाते,सचिव- दिनेश पाटील, यांची भाषणे झाली. वंदना सोहोनी, सुनंदा मुंडे, जगन्नाथ भोसले, विलास रूपटक्के, राधाकिसन चौधरी यांनी सादर केलेल्या भक्ती गीतामुळे वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते. नातेवाईकांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संस्थचे इतर सदस्य, ज्येष्ठ नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित (Chikhali) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.