Pune : पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचे काँग्रेसने मागविले अर्ज

एमपीसी न्यूज – देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी (Pune) सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आघाडी घेत काँग्रेस पक्षातर्फे आगामी पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आगामी पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. संपूर्ण माहितीसह हे अर्ज दि. 9 जानेवारी 2024 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत पक्ष कार्यालय काँग्रेस भवन शिवाजीनगर, पुणे येथे देण्याची (Pune) विनंती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी सर्वत्र रिमझिम पावसाच्या सरी

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड प्रबळ इच्छुक आहेत. दरम्यान, भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणे गरजेची होती. ती निवडणूक न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावले. आता सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे.

माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकर विजयी झाले. त्यामुळे आता काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसचा प्रचार करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.