Alandi : आळंदीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज : आज रात्री साडे आठच्या सुमारास अवकाळी पावसाने (Alandi) आळंदी शहरात हजेरी लावली. हे पावसाचे थेंब मातीत मिसळल्याने मातीचा सुगंध हवेत दरवळत होता. तसेच अवकाळी पाऊस आल्याने बाहेर कामानिमित्त पडलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती.

काही दुचाकीस्वार तसेच पायी चालणारे नागरिक या पावसात भिजताना दिसत होते. तर काही नागरिक पावसाने भिजू नये यासाठी आडोसा शोधून त्या ठिकाणी उभे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.