India News – ऑनलाईन खेळांवर जीएसटी झाला 28 टक्के; नेटकरी नाराज

एमपीसी न्यूज – जीएसटी कौन्सिलने ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कसिनो यांच्यावर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय (India ) घेतला आहे, ज्यामुळे ऑनलाइन गेमिंग करणाऱ्यांकडून त्वरित नाराजगीची भावना पसरली आहे.

11 जुलै रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या 50 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. GST परिषदेने सांगितले की, “ऑनलाइन गेमिंगवर कर आकारण्याचा निर्णय काळजीपूर्वक विचार केल्यानंतर घेण्यात आला आहे.

त्यामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे नियमन होण्यास मदत होईल.”

India :भारताचा वेस्ट इंडिज दौरा आजपासून सुरु; यशस्वी, ऋतुराजला संधी?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “ऑनलाइन गेमिंग आणि कसिनोवरील 28 टक्के जीएसटीशी संबंधित निर्णय कोणत्याही विशिष्ट उद्योगाकडे लक्ष्य केंद्रित करून घेतला गेला नाही आहे.

निर्णय बरेच विचार करून घेण्यात आले आहेत व गोवा, सिक्कीम सारख्या राज्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून घेतले आहेत.

गोवा आणि सिक्कीम असे राज्य आहेत जिथे पर्यटन कसिनोमुळे वाढले आहे म्हणून त्या राज्यातील प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.”

ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी लावण्याच्या निर्णयावर लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत.

ऑनलाइन गेमिंग कंपन्या आणि पारंपारिक गेमिंग कंपन्या यांच्यातील खेळाचे क्षेत्र समतल करण्यास मदत होईल असे म्हणत काही लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

तर काहींचे म्हणणे आहे की यामुळे ऑनलाईन गेमिंगच्या ग्राहक कमी होऊ शकतात व या उद्योगांना मोठा आर्थिक धक्का बसू शकतो असेही (India ) मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.