India News : भारताचा मोस्ट वॉन्टेड शाहिद लतीफची पाकिस्तान मध्ये हत्या

एमपीसी न्यूज -भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ याची (India News) पाकिस्तान मधील सियालकोट येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असले ल्या शाहिदवर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले होते.

Pune : ससून रुग्णालयातील डॉक्टरांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करा- रवींद्र धंगेकर

शाहिद लतीफ हा पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील गुजरावाला (India News) येथील होता. तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला होता. शाहिद हा सियालकोट सेक्टरचा कमांडर होता. त्याने भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यामध्ये अनेकदा सहभाग घेतला होता.

शाहिद याला 12 नोव्हेंबर 1994 मध्ये अटक करण्यात आली होती. तो भारतातील कारागृहांमध्ये 16 वर्ष होता. सन 2010 मध्ये त्याची पाकिस्तानात रवानगी करण्यात आली होती.

पंजाब मधील पठाणकोट येथील एअरबेसवर दोन जानेवारी 2016 रोजी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये सैन्यदलाच्या सात जवान शहिद झाले. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार शाहिद हाच होता. त्याची पाकिस्तान मध्ये अज्ञात आणि गोळ्या झाडून हत्या केली (India News) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.