Pakistan : आसिफ झरदारी पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती; महमूद अचकझाईचा पराभव करून दुसऱ्यांदा मिळवले सर्वोच्च पद

एमपीसी न्यूज : पाकिस्तानमध्ये राष्ट्रपती पदाच्या (Pakistan) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठी शनिवारीच मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी यांना 411 मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी महमूद अचकझाई यांना केवळ 181 मते मिळाली आहेत. नवे राष्ट्रपती आसिफ झरदारी हे विद्यमान राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांची जागा घेतील, ज्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

आसिफ अली झरदारी तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा पाकिस्तानच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचले आहेत. असिफ झरदारी हे सप्टेंबर 2008 ते 2013 पर्यंत पाकिस्तानचे अध्यक्ष होते. आता ते दुसऱ्यांदा पाकिस्तानचे राष्ट्रपती बनले आहेत.

आसिफ झरदारी यांना नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 255 मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या महमूद अचकझाई यांना 119 मते मिळाली. आसिफ झरदारी यांना नॅशनल असेंब्ली आणि चार प्रांतांमध्ये एकूण 411 इलेक्टोरल मते मिळाली, तर अचकझाई यांना एकूण 181 मते मिळाली.

Pune : पुण्यात शरद पवार, अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर येणार का?

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयच्या पाठिंब्याने पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आसिफ अली झरदारी यांच्या विरोधात लढलेल्या महमूद खान अचकझाई यांनी काही भागात, विशेषत: पंजाबमध्ये जोरदार मते मिळवली. परंतु, असे असूनही ते विजयापासून दूर होते. निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप करत त्यांनी कोर्टात हस्तक्षेप करण्याची  (Pakistan)विनंतीही केली, मात्र कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानातील अत्यंत प्रतिष्ठित राजकीय घराण्यातील आहेत. ते माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांचे पती आणि झुल्फिकार भुट्टो यांचे जावई आहेत. भुट्टो हे 70 च्या दशकात पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानही होते. झरदारी यांचा मुलगा बिलावल भुट्टो हेही पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री राहिले आहेत आणि आताही त्यांचा पक्ष पीपीपी सरकारमध्ये भागीदार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.