Pune : पुण्यात शरद पवार, अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर येणार का?

एमपीसी न्यूज – वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाची (Pune) सभा रविवारी (10 मार्च) संस्थेच्या मांजरी येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. इंद्रजीत मोहिते, जयप्रकाश दांडेगावकर, विशाल पाटील, बी. बी. ठोंबरे, श्रीराम शेटे, नरेंद्र घुले पाटील, शिरीषकुमार नाईक, अशोक पवार, आमदार बबनराव शिंदे, अरविंद गोरे, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील, दिलीप देशमुख, राजेश टोपे, गणपतराव तिडके, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील असे 41 सदस्य आहेत.

Mp Shrirang Barne : मोहननरमध्ये होणार दीड कोटींचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन

अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी विशेषतः अजित पवार यांनी एकाच कार्यक्रमात एकत्र येण्याचे टाळले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पवारांनी एकत्र (Pune) येणे टाळले आहे. जगावाटपात बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार देणार, असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.