World Cup 2023 – थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी; पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात

एमपीसी न्यूज – चेन्नई येथे शेवटच्या विकेट पर्यंत रंगलेल्या थरारक (World Cup 2023) सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एक गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पाकिस्तानने या विश्वचषकात 6 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे, तर 4 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे इंग्लंड पाठोपाठ पाकिस्तानचे आव्हानही जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.

चेन्नई येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात (World Cup 2023 )नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशा जनक झाली . सलामीवीर अब्दुल्ला शफिक 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच इमाम उल हक देखील बाद झाला. त्यामुळे 2 बाद 36 धावा अशी स्थिती पाकिस्तानची झाली. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या रिझवानने 31 धावांची खेळी केली.

Pune : पुणे-कोल्हापूर दरम्यान लवकरच विशेष रेल्वे प्रवाशांच्या सेवेत

बाबरच्या सोबतीने त्याने 48 धावांची भागीदारी रचली. फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. यावेळी कर्णधार बाबर आझम याने अर्धशतकी खेळी केली तो 50 धावा काढून बाद झाला, त्यानंतर साउद शकील 52 आणि शादाब खान 42 जोडीने 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मोहम्मद नवाजने 24 धावांचे योगदान योगदान दिले. पाकिस्तानचा डाव 46.4 षटकांत सर्वबाद 270 धावांवर आटोपला. यावेळी पाकिस्तानला 50 षटकेही खेळता आले नाही. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेस शम्सी याने 4 गडी बाद केले. तर मार्को जानसेन याने 3 बळी घेतले. गेरॉल्ड कॉटझी याने 2 विकेट्स काढल्या.

पाकिस्तानने ठेवलेले 271 धावांचे लक्ष गाठताना आफ्रिकेच्या डावाची सुरुवात फारशी बरी झाली नाही. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा क्विंटन डेकॉक हा केवळ 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार टेंबा बउमा हा देखील झेलबाद झाला. एका बाजूने संयमी फलंदाजी करणारा वान डेर डसेन 21 धावा करून माघारी परतला. तथापि, मधल्या फळीतील फलंदाज मार्करम यांनी एकाकी झुंज लढत 91 धावांची दमदार खेळी केली.

त्याच्या शतक 9 धावांनी हुकले. डेव्हिड मिलरने 29 धावांचे योगदान दिले. 5 बाद 206 वरून 8 बाद 250 अशी नाजूक स्थिती आफ्रिकेची झाली. यावेळी पाकिस्तानच्या तेच गोलंदाजांनी आक्रमक मारा करताना आफ्रिकेच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. हरीस रौफ आणि शहेनशहा आफ्रिदी यांनी पाकिस्तानचे सामन्यामध्ये पुनरागमन केले. आफ्रिकेकडे अधिक चेंडू आणि कमी धावा अशी स्थिती असतानाही त्यांच्याकडे केवळ दोनच गडी शिल्लक असल्याने त्यांची स्थिती बिकट झाली.

हरीस रौफ स्वतःच्याच गोलंदाजीवर नगेडीला कॉटन बोल्ड केले. यावेळी 25 चेंडूत 11 धावांची गरज होती . त्यामुळे आफ्रिकेवर अधिक दबाव वाढला . यावेळी आफ्रिकेच्या केशव महाराजने संयमी खेळी करत एक बाजू लावून धरली, त्याने शम्शीला सोबतीला घेत पाकिस्तानच्या हातातून सामना हिसकावून घेतला. जलदगती गोलंदाजांचे षटक संपल्याने पाकिस्तानकडे फिरकी गोलंदाज लावण्याशिवाय पर्याय नव्हता.

यावेळी आलेल्या मोहम्मद नवाजला केशव महाराज ने फाईन लेग ला चौकार मारत आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्यांनी सहा सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. तसेच पाकिस्तानने सहा सामन्यांमध्ये चार पराभव आणि दोन विजय मिळवले आहेत त्यामुळे त्यांचे विश्वचषकातील पुढील वाटचाल खडतर असणार आहे. त्यांचे पुढील सामने न्युझीलँड, इंग्लंड आणि बांगलादेश सोबत असल्याने त्यांचे विश्वचषकातील जवळपास संपुष्टात बोलले जातात. सामनावीर तबरेस शम्सी ठरला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.