Pune : पुणे-कोल्हापूर दरम्यान लवकरच विशेष रेल्वे प्रवाशांच्या सेवेत

एमपीसी न्यूज – रेल्वेने पुणे- कोल्हापूर – पुणे अशी ( Pune) विशेष गाडी प्रवाशांच्या मागणीनुसार 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाडी मुळे (Pune) पुणे-कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Pimpri – प्रसाद सस्ते आणि समाधान दगडे यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड
सह्याद्री एक्सप्रेस ही कोल्हापूर- पुणे दरम्यान धावणारी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दिवाळीत पुणे-कोल्हापूर-पुणे अशी विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीला 20 रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. या गाडीला 16 डबे असतील.

5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान या गाडीच्या 114 फेऱ्या होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने याबाबत काल (शुक्रवारी) परिपत्रक काढले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.