Pimpri : पिंपरीतल्या लता कुमार पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये साजरा करतात गणेशोत्सव

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील मुळच्या रहिवासी (Pimpri) असलेल्या लता अर्जुन कुमार या मागील 32 वर्षांपासून पाकिस्तान मधील कराची शहरात वास्तव्य करीत आहेत. भारतातून पाकिस्तानात गेल्यापासून त्या दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. कराचीमध्ये त्या दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करतात.

लता कुमार यांचे 32 वर्षांपूवी अर्जुन कुमार यांच्याशी लग्न झाले. त्यांचे पती कराची येथे राहत असल्याने त्या लग्नानंतर कराची येथे गेल्या. कराची येथे गेल्यानंतर त्यांनी भारतातील परंपरा आणि सण, उत्सव साजरे करणे सुरूच ठेवले. कराची येथील क्लिफ्टन परिसरात त्या राहतात.

कराची शहरातील क्लिफ्टन परिसरात शेकडो मराठी बांधव राहतात. ते सर्वजण दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. श्रावण संपला की पाकिस्तान मधील मराठी कुटुंबांना गणेशोत्सवाची ओढ लागते. गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा करून गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

त्यानंतर लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. या गणेशोत्सवासाठी पाकिस्तानच्या सबंध सिंध प्रांतात पसरलेले नातेवाईक आणि आप्तेष्ट येतात.

सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सवासाठी (Pimpri) आलेल्यांना चपाती, भाजी, वरण, भात, मोदक, करंजी असा प्रसाद दिला जातो. पहिल्या दिवशी रात्रभर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती बाप्पाची पूजा करून त्याचे विसर्जन केले जाते.

Sangvi : लेझीम, लाठीकाठी, मर्दानी खेळ, शिवरायांच्या मावळ्यांचा जल्लोष करत अरविंद एज्युकेशनच्या गणरायाला निरोप

बीबीसी मराठीने दिलेल्या एका वृत्तात लता सांगतात की, “भारताप्रमाणेच कराची मध्ये देखील आम्ही गणपती बसवतो. भारतात दहा दिवसांचा गणेशोत्सव असतो. आम्ही इकडे कराचीमध्ये दीड दिवसाचा गणेशोत्सव करतो.

कराची मध्ये येऊन 32 वर्ष झाली आहेत. गणेशोत्सवात गरबा खेळतो, गणपतीची आरती करतो, त्याला नैवेद्य दाखवतो. यानिमित्ताने सगळेजण एकत्र येतात. याचा खूप आनंद वाटतो, अशा भावना लता यांनी व्यक्त केल्या.

(छायाचित्रे सौजन्य – बीबीसी मराठी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.