Sangvi : लेझीम, लाठीकाठी, मर्दानी खेळ, शिवरायांच्या मावळ्यांचा जल्लोष करत अरविंद एज्युकेशनच्या गणरायाला निरोप

एमपीसी न्यूज : टाळ मृदंगाचा गजर, लेझीम, लाठीकाठी, मर्दानी खेळ,  (Sangvi)शिवरायांच्या मावळ्यांचा जल्लोष, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, विविध कसरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या गणरायाला विद्यार्थी, शिक्षकांनी निरोप दिला. दरम्यान, ‘थुंकी मुक्त रस्ता अभियाना’द्वारे रस्त्यावर थुंकू नये, स्वच्छ रस्ते, स्वच्छ शहर याविषयी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी जनजागृती केली.

गणरायाला निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करीत (Sangvi ) सांगवीतून बाप्पाची मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांचे मर्दानी खेळ, लाठीकाठी, टाळपथक, लेझिम, शिवरायांच्या मावळ्यांचा जल्लोष, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य हे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढली.

Pune : गणेशोत्सवात पीएमपीएमएलचे जादा दर रात्री अकरानंतर आकारावेत – प्रवाशांची मागणी

आकर्षक फुलांची सजावट, विद्यार्थ्यांचा पांढरा ड्रेस कोड नागरिकांचे लक्ष आकर्षून घेत होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी बालचमुंच्या कसरती, लेझीम पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. शिक्षिकांनी फुगड्यांचे फेर धरले होते. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लाठीकाठीच्या कसरती अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. ही विसर्जन मिरवणूक शितोळेनगर, गजानन महाराज मंदिर, संविधान चौकामार्गे अहिल्याबाई होळकर घाटावर आली. गणपतीची आरती करून गणरायाला जड अंतःकरणाने निरोप दिला.


मर्दानी खेळ, लाठीकाठी, टाळपथक, लेझिम, शिवरायांच्या मावळ्यांचा जल्लोष, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य ही पथके बसविण्यात शिक्षिका नीलम मेमाणे, स्मिता बर्गे, हेमाली जगदाळे, सुनिता ठाकूर, अमृता अमोलिक यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
विसर्जन मिरवणुकीत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटिल फ्लॉवरच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, लिटिल फ्लॉवर प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, उदय फडतरे, भटू शिंदे, अक्षय नाईक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.