Wakad : व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगत 54 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यवसायात गुंतवणूक (Wakad) केल्यास चांगला नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीला 54 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही नफा न देता गुंतवणूकदार व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना 25 मे 2021 ते 24 सप्टेंबर 2023 या कालावधीत भूमकर चौक वाकड येथे घडली.

मंगेश शामसुंदर दळवी (वय 44, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित शामराव माने आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माने याची टेकरिचेस प्रा ली नावाची कंपनी आहे. त्याद्वारे माने ई लर्निंग कंटेंट डेव्हलपमेंट सर्विस देण्याची तसेच कि बोर्ड आणि संबंधित पुस्तके वितरण करण्याचा व्यवसाय करतो.

त्याने फिर्यादी दळवी यांना ‘माझ्या व्यवसायात गुंतवणूक करा. मी तुम्हाला चांगला नफा मिळवून देतो’ असे सांगून व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

Bopkhel : रिक्षा चालकाला लोखंडी रॉडने मारहाण

दळवी यांनी माने याच्या सांगण्यावरून (Wakad) व्यवसायात 54 लाख 10 हजार रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर माने याने दळवी यांनी गुंतवलेली रक्कम अथवा त्यावरील नफा न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.