Pune : गणेशोत्सवात पीएमपीएमएलचे जादा दर रात्री अकरानंतर आकारावेत – प्रवाशांची मागणी

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल (Pune) प्रशासनातर्फे गणेशोत्सव काळात जादा बसेसचे नियोजन केले आहे. मात्र या कालावधीत रात्री दहा नंतर सुटणाऱ्या बससाठी नियमीत तिकीट दरात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.या वाढीचा सर्वसामान्य व नियमीतपणे प्रवास करणाऱ्या नागरिकांना फटका बसत आहे. त्यामुळे ही दर वाढ रात्री दहा नाही तर अकरा नंतर करावी अशी मागणी प्रवाश्यानी केली आहे.

Lonavala : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील 16 लाख 50 हजारांचा ऐवज केला लंपास

ही दरवाढ तब्बल 50 ते 20 टक्क्यांनी जास्त असून जे लोक नियमितपणे पीएमपीएमएल ने प्रवास करतात त्यांना याचा रोज फटका बसत आहे. कारण बरेच ऑफीस हे उशीरा सुटत असल्याने घरी जाताना नागरिकांना दहा तरी वाजतात. सर्वसामान्यांसाठी ही रोजची घरी परतण्याची वेळ आहे. मात्र याच वेळेत पुण्यातील गणपती पाहण्याासाठी अनेकजण बाहेर पडतात.

त्यांच्यासाठी या जादा बसेस सोडल्या असून त्यासाठी 5 रुपये जादा आकारले जात आहेत. मात्र पाच रुपयांचे तिकीट 50 टक्केंनी वाढून 10 रुपये झाले आहे. यात जो नियमीतपणे पीएमपीएमएलने प्रवास करतो त्याला देखील रोज जास्तीचे दर आकारले जात आहेत. यावर उपाय म्हणून पीएमपीएमएलने रात्री दहा नंतर जादा दर न आकारता ते रात्री अकरा नंतर आकारावेत,जेणेकरून ऑफिसवरून परतणाऱ्यांना त्याचा भुर्दंड बसणार नाही, असे मत एमपीसी न्यूजशी बोलताना पीएमपीएमएलचे नियमीत प्रवासी मंगेश उंब्रजकर यांनी व्यक्त केले आहे.

काय आहे पीएमपीएमएलचे जादा बसेसचे धोरण

पुणे महानगर परीवहन महामंडळाकडून 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत जादा बसेसचे नियोजन केले आहे. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत या जादा बसेस सुरु राहणार आहेत. कालावधीत पहिल्या टप्प्यामध्ये 20 ते 21 तसेच 27 सप्टेंबर यावेळी 168 जादा बसेस सुटणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 22 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर व 28 सप्टेंबर या दिवशी 654 जादा बसेस असे नियोजन करण्यात आले आहे.

या जादा बसेसचे नियोजन पुढिल प्रमाणे असणार आहे.

1) दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्री 10 नंतर बंद राहणार असून रात्री 10 नंतर सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहणार आहेत.

2) रात्री 10 नंतर बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये 5 रुपये जादा दर आकारणी करण्यात येईल.

3) गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्रौ बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांना रात्री 12 वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत.

4) गणेशोत्सव कालावधीत शहर विभागातील रस्ते सायंकाळी पोलीस खात्याकडून बंद ठेवले जातात. त्यामुळे शहराच्या आतील भागातील बससेवा पर्यायी मार्गाने चालू ठेवण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.