Lonavala : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील 16 लाख 50 हजारांचा ऐवज केला लंपास

एमपीसी न्यूज – महिलांनो गणेशोत्सवात फिरायला जात असताना (Lonavala) आपल्या अंगावरील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. लोणावळा शहरामध्ये महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये तब्बल 16 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पळवून नेला आहे.

Lonavala : लोणावळा रेल्वे स्थानक भागातून 2 मुलींचे अपहरण करून घरात डांबून ठेवत अत्याचार
शामल दिपक गोणते (रा. गावठाण लोणावळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास गोणते ह्या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गंठण, शाही हार व मणी मंगळसूत्र असा सुमारे साडेतेरा ते चौदा तोळे वजनाचा (6.75000/-) रूपये किंमतीचा ऐवज हिसका देऊन चोरून नेला आहे.

अशीच दुसरी घटना तुंगार्ली इंदिरानगर भागात घडली आहे. याठिकाणी लक्ष्मी शिवलिंग दळवी (वय 47 वर्ष रा. इंदिरानंगर न्यु तुंगार्ली लोणावळा) या ब्रिजेश हॉटेल ते इंदिरानगर रोडवर इको गाडीमध्ये बसल्या असताना  चोरटयांनी गळयातील गंठण, शाही हार, मणीमंगळसुत्र असा एकुण 9,75000/- रु सोन्याचे दागिने हिसका मारुन चोरी करुन नेले आहेत.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी अज्ञात चोट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड हे पुढील तपास (Lonavala) करतआहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.