Sangvi : पीएमपीएमएल मधून प्रवास करताना महिलेची सोन्याची माळ चोरीला

एमपीसी न्यूज – सध्या पीएमपीएमएल बस मधून प्रवास (Sangvi) करत असताना अनेक महिलांचे दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे बसमध्ये चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा देखील प्रवाशांमध्ये आहे. असाच एक प्रकार नवी सांगवी येथे प्रवास करत असणाऱ्या एका महिलेसोबत घडला.

या महिलेची तब्बल दीड तोळ्याची सोन्याची माळ पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना चोरीला गेली. ही घटना 17 सप्टेंबर रोजी नवी सांगवी येथील सार्वजनिक रोडवर घडली.

याप्रकरणी महिलेने रविवारी (दि.24) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सांगवी पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : गणेशोत्सवात पीएमपीएमएलचे जादा दर रात्री अकरानंतर आकारावेत – प्रवाशांची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पीएमपीएमएल प्रवास करत (Sangvi) असताना बसमध्ये गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरांनी त्यांच्या गळ्यातील तब्बल 45 हजार रुपयांची 14 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ चोरून नेली आहे. ही घटना उघडकीस येताच फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मात्र याप्रकरणी नागरिकांनी देखील बस प्रवासात स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, महिलांनी प्रवासादरम्यान दागिने वापरणे टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सांगवी पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.