Asian Games 2023 : आशियाई 19 व्या क्रीडा स्पर्धेत भारताने मिळवले पहिले गोल्ड मेडल

आतापर्यंत भारताच्या नावे 10 पदकं

एमपीसी न्यूज- चीनमधील हांगझाऊ येथे पार पडत असलेल्या 19 व्या आशियाई (Asian Games 2023) क्रीडा स्पर्धे मध्ये भारताने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल शूटिंग मध्ये सुवर्ण पदकाची कमाई करत 10 मीटर एअर रायफल शूटिंग मध्ये भारताने विश्वविक्रमही आपल्या नावे केला आहे.

Pune : गणेशोत्सवात पीएमपीएमएलचे जादा दर रात्री अकरानंतर आकारावेत – प्रवाशांची मागणी

भारताच्या रुद्राक्ष पाटील, दिव्यांश सिंह पवार, ऐश्वर्या तोमर यांनी भारताला या स्पर्धेमधील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. या तिकडीने 1893.7 गुणांसह विश्वविक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी हा विश्वविक्रम चीनच्या नावे होता. त्यांना 1893.3 gun होते. हा विक्रम मोडून काढत भारताने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. आतापर्यंत भारताला 6 कांस्य, 3 रौप्य आणि 1 सुवर्ण असे 10 पदकं मिळाली आहेत. ही 10 पदकं रोईंग- 5 आणि शूटिंग -5 या खेळात मिळाले आहेत. भारताला इतर खेळामध्ये अजून पदकं मिळण्याची आशा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.