Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नावे आतापर्यंत 21 पदकं

एमपीसी न्यूज : चीनमधील हॉंगझाऊ (Asian Games) सुरु असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. आतापर्यंत भारताच्या नावे 21 पदकं जमा झाली आहेत. यामध्ये 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे.

नेमबाजी, रोईंग, नौकानयन, क्रिकेट, घोडस्वारी या पाच क्रीडा प्रकारात ही पदकं भारताला मिळाली आहेत.

नेमबाजी 11, रोईंग 5, नौकानयन 3, क्रिकेट 1, घोडस्वारी 1 असे एकूण 21 पदकं मिळाली आहेत. यापैकी 3 सुवर्ण नेमबाजी, 1 क्रिकेट, 1 घोडस्वारी अशा पाच सुवर्ण पदकं मिळाली आहेत.

Alandi : आळंदी पुणे रस्त्यावर पावसामुळे ठीक-ठिकाणी खड्डे

तसेच 3 रौप्य पदकं नेमबाजी, 2 रोईंग, 1 नौकानयन या अशी एकूण 6 रौप्य पदकं मिळाली आहेत. तर, 5 कांस्य पदकं (Asian Games) नेमबाजी, 3 रोईंग, 2 नौकानयन अशी एकूण 10 कांस्य पदकं भारताला मिळाली आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या देशांच्या यादीमध्ये भारत 21 पदकांसह 6 व्या स्थानावर आहे. तर चीन या यादीमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या नावे 62 सुवर्ण, रौप्य आणि 13 कांस्य असे तब्बल 110 पदके जमा आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.