Alandi : आळंदी पुणे रस्त्यावर पावसामुळे ठीक-ठिकाणी खड्डे

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) हद्दीतील आळंदी पुणे रस्त्यावरील देहूफाटा सिग्नल ते धाकटी पादुका रस्त्यावर तसेच धाकटी पादुका च्या जवळ पास (आळंदी हद्दी बाहेरील) तेथील असणाऱ्या रस्त्यावर ठीकठिकाणी पावसामुळे खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे.

Somatne : मिरवणुकीत घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केली म्हणून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

या खड्ड्यांमुळे येथून दुचाकीसह चारचाकी वाहनास रहदारी करताना त्या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी आळंदी हद्दीतील व बाहेरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात संबंधीत व स्थानिक प्रशासना कडून बुजवण्यात आले होते. परंतु आताच्या जोरदार झालेल्या पावसामुळे पुन्हा त्या रस्त्यावर खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. संबंधित प्रशासनाने त्या ठिकाणी खड्डे पडू नये यासाठी कायम स्वरूपी नियोजन करावे. अशी मागणी काही नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.