Alandi : एक दिवस शाळे साठी उपक्रम ” – एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयात साजरा

एमपीसी न्यूज -आळंदी येथील एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयात (Alandi )पिंपरी चिंचवड शहर वाहतूक विभाग आळंदी – दिघी शाखे अंतर्गत ” एक दिवस शाळेसाठी ” उपक्रम अंतर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदुरकर व पोलीस उपनिरीक्षक रणदिवे यांनी विद्यार्थ्यांना रस्ते वाहतूक अपघात व गुन्हे या बद्दलची माहिती दिली. व या प्रसंगी त्यांनी विविध वाहतूक नियम , सायबर गुन्हे, व्यसन व तरुणाई मध्ये असलेली व्यसनाधीनता यांची उदाहरणासहित भीषणता विशद केली. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सदाशिव कुंभार यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन सत्कार केला.

Akurdi : आकुर्डीत युवा सेनेचा मेळावा; युवसेनेच्या 272 पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

या कार्यक्रमानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदूरकर, पोलीस उपनिरीक्षक रणदिवे, सहा. पोलीस उपनिरीक्षक बनकर , महिला पोलीस नाईक अंगारे मॅडम आणि पोलीस शिपाई टुमनर तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत शिशुपाल यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सदाशिव कुंभार यांनी केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.