Hinjawadi : कंटेनरच्या धडकेत वृद्ध सायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भूमकर चौकात एका कंटेनरने (Hinjawadi)सायकलवरून जाणाऱ्या वृद्धाला धडक दिली. त्यात वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 9) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडला.

नंदकिशोर तोताराम खैरनार (वय 60, रा. साखरेबेंद्रेवस्ती, हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश नंदकिशोर खैरनार (वय 27) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एनएल 01/एडी 9806) चालक रोशन लाल पटेल (वय 24, रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : सरदार पटेल यांच्या एकतेचा वसा लेवा पाटीदार समाजाने जपला : शंकर जगताप

पोलिसांनी दिलेल्या (Hinjawadi )माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील नंदकिशोर सायकलवरून शनिवारी सकाळी कामावर जात होते. ते भूमकर चौकात वाकड वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर आले असता त्यांना एका कंटेनरने धडक दिली. त्यात नंदकिशोर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर आरोपी रोशन पटेल घटनास्थळावरून पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.