Pimpri : सरदार पटेल यांच्या एकतेचा वसा लेवा पाटीदार समाजाने जपला : शंकर जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात नोकरी, व्यवसाय,‍ शिक्षणानिमीत्त वास्तवास (Pimpri)असलेल्या लेवा पाटीदार समाजाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला दिलेला एकतेचा संदेश हा एक वसा म्हणून जपला आहे.

 

औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात लेवा पाटीदार समाजाचे योगदान असल्याचे प्रतिपादन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

निवृत्ती लॉन्स, रावेत येथे लेवा पाटीदार समाजाचा लेवा (Pimpri)जल्लोष “स्नेह एवं सांस्कृतिक मेळावा” शनिवारी सायंकाळी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, एलएमसी ग्रूपचे अध्यक्ष मिलींद चौधरी, सांगवी लेवा पाटीदार मित्र मंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे, पिंपरी चिंचवड भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष नीना खर्चे, डॉ. यतिन भोळे विजया जंगले, पुरुषोत्तम पिंपळे, कृष्णा खडके, विनोद इंगळे, दिपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे आदी मान्यवरांसह पुण्यातील लेवा बांधव आणि भगिनींनी अत्यंत उत्फुर्तपणे प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

नामदेव ढाके म्हणाले, समाजात असलेल्या एकता हिच समाजाचे मोठे बलस्थान आहे. शिक्षण, राजकारण, उद्योग– धंदे, व्यवसाय आदी क्षेत्रांमध्ये समाजाचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. समाजातील कुठलाही व्यक्ती या सर्व गोष्टींपासून वंचित राहणार नाही, याची दखल घेतली जाते, ही अभिमानाची बाब असून सामाजिक – आर्थिक क्षेत्रात समाज अधिक प्रगती करत असल्याचा विश्वास व्यक्त करीत वरिष्ठ मंडळींनी उद्योग व कौशल्ये विकासासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

प्रसंगी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते उत्कृष्ट व प्रेरणादायी समाजकार्य केलेल्या अण्णासाहेब ऊर्फ पुरुषोत्तम पाटील, कुलगुरु डॉ. सुनील भिरुड, डॉ. दिलीप सरोदे, भालचंद्र कोलते, दिव्यांग उडान फाउंडेशनच्या संस्थापिका हर्षाली पाटील या 5 मान्यवरांचा जीवन गौरव आणि सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, लेवा भ्रातृ मंडळाच्या सातव्या स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले. 10 बांधवांनी अवयव दान व नेत्रदान करण्यासाठीचे फॉर्म भरले. त्याचबरोबर, वात्सल्य अपंग व अनाथ आश्रम, दापोडी येथील अनाथ आश्रम व इतर संस्थांमधील अनाथ बांधवांसाठी समाज बांधवांकडून वापरण्यायोग्य जुने कपडे दान करण्यात आले. 12 महिला बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या स्वादीष्ठ खाद्य व इतर वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.

Sangvi : एक लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा 15 हजार परताव्याचे आमिष ;गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक

लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष विकास वारके यांनी भ्रातृ मंडळाद्वारे राबविलेल्या विशेष समाजोपयोगी व विद्यार्थी स्नेही उपक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसने जडू नये याकरिता ‘संयम प्रशिक्षण’, मुला- मुलींमध्ये नेतृत्व गुण यावेत, यासाठी उन्हाळी शिबिर, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वृद्धी उपक्रम, युथ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, करिअर गाईडन्स शिबिरे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प, इंडस्ट्री अकडमी मीट, अत्यंत गरीब व कोरोना व्याधीमुळे वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांना शैक्षणिक वित्त सहाय्य इत्यादी अनेकविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुजा परतणे, प्रा. तिलोत्तमा ब-हाटे, पुनम चौधरी यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.