Maval : द्रुतगती मार्गावर कंटेनर चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Maval )रस्त्याच्या बाजूला कंटेनर उभा करून झोपलेल्या चालकाला तीन अनोळखी चोरट्यांनी लुटले. कंटेनरच्या केबिनचा दरवाजाचा काच फोडून आरोपी आत आले होते. ही घटना शनिवारी (दि. 9) सकाळी सहा वाजता उर्से टोल नाक्याजवळ घडली.

नूर मुस्ताक अहमद (वय 28, रा. जम्मू काश्मीर) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : शिक्षणाच्या मजबूत पायावर आयुष्याची उभारणी – हभप दिगंबर ढोकले महाराज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Maval )फिर्यादी अहमद हे कंटेनर चालक आहेत. ते त्यांच्या ताब्यातील कंटेनर घेऊन शनिवारी मध्यरात्री मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होते. शनिवारी पहाटे त्यांना झोप येत असल्याने त्यांनी उर्से टोल नाक्याच्या पुढे रस्त्याच्या बाजूला कंटेनर पार्क केला आणि केबिनमध्ये झोपी गेले. सकाळी सहा वाजताच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी कंटेनरच्या केबिनच्या काचा फोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी अहमद यांच्याकडील आठ हजारांचा मोबाईल फोन आणि 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 18 हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.