Pimpri : शिक्षणाच्या मजबूत पायावर आयुष्याची उभारणी – हभप दिगंबर ढोकले महाराज

एमपीसी न्यूज – संत कृपा झाली इमारत फळा आली। ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस।। या (Pimpri)ओवी प्रमाणे शिक्षणाच्या मजबूत पायावर आयुष्याची उभारणी होत असते. विद्यार्थ्यांनी आई, वडील, गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर अभ्यास करून ज्ञान प्राप्ती करून सद्विचारांचे अनुकरण केले तर जीवन यशस्वी होईल. देशाचे सुजाण, सुसंस्कृत नागरिक म्हणून तुम्ही प्रगती कराल, असे मार्गदर्शन हभप दिगंबर ढोकले महाराज यांनी प्रवचनातून विद्यार्थ्यांना केले.

 

शिक्षण प्रसारक मंडळाच्या  निगडी शाळेच्या रौप्य महोत्सवी (Pimpri )वर्षानिमित्त सुरू असलेल्या उपक्रमातील आणि आळंदी यात्रा कार्तिक भागवत एकादशी निमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदाय आणि भागवत संप्रदायाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी तसेच महाराष्ट्रातील संतांची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्यावर संस्कार घडावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी हभप किसन महाराज चौधरी, शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, सविता बिराजदार, लीना वर्तक, उमा घोळे, मुख्याध्यापक रविंद्र मुंगसे उपस्थित होते.

Pune : विचारांच्या तलवारीला धारदार करणे गरजेचे : तुषार गांधी

विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी जन्मलेल्या निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांना समाजाने वाळीत टाकले. पैठण येथील ब्रम्ह सभेत चराचरात चैतन्य भरलं आहे, प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचे अस्तित्व आहे; याची जाणीव ज्ञानेश्वर महाराजांनी करून दिली. त्यावेळी ज्ञानोबांनी रेड्या मुखी वेद वदवून घेतला. म्हणूनच भाविक भक्त ज्ञानेश्वरांना ज्ञानोबा माऊली म्हणतात. ज्ञानोबा विश्व माऊली आहेत, असे हभप दिगंबर ढोकले महाराज यांनी सांगितले.

शिक्षिका स्नेहल देशपांडे, रमा जोशी यांनी अभंग गायन केले. इयत्ता चौथीमधील विद्यार्थी सिद्धक शिंदेने तबल्याची साथ दिली. स्वागत सुनील सावंत, शिवाजी बांदल, सूत्रसंचालन प्रीती शेटे आणि दीपा सातपुते यांनी केले.

शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.