Alandi : राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने एमआयटी महाविद्यालायातर्फे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज : आळंदी येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे (Alandi)औचित्य साधुन एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालायातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि तर्पण रक्तपेढी विश्वराज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर रोजी रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर यांचे आयोजन करण्यात आले.  158 पात्र रक्तदात्यांनी रक्तदान करून जागरूक नागरिकांचे कर्तव्य पार पाडले.

Pimpri : ज्येष्ठांना एकाच रुग्णालयात वैद्यकीय सुविधा

तसेच या कार्यक्रमात २५० विद्यार्थांचे हीमोग्लोबिन, रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स,( Alandi)इत्यादी तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये महाविद्यालयीन युवक, युवती, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, पालक या सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

महविद्यालयीन युवकांमध्ये समाजप्रती आपुलकी निर्माण व्हावी व आपल्या रक्तदानामुळे गरजु लोकांचे प्राण वाचतील यासाठी मुलांना प्रेरित करणे हा या शिबिराचा उद्देश होता. महाविद्यालायचे प्राचार्य बी. बी. वाफारे, उप प्राचार्य अक्षदा कुलकर्णी व डॉ मानसी अतितकर, सर्व विभाग प्रमुख रायसो अधिकारी अरविंद वागस्कर उपस्थित होते.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.