Talegaon Dabhade :राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री संयुक्त जयंती इंद्रायणी महाविद्यालयात साजरी

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी (Talegaon Dabhade)  महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे,उपप्राचार्य प्रा.संदीप भोसले,प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले की,या दोन्ही थोर (Talegaon Dabhade) पुरुषांची चरित्रे म्हणजे निव्वळ चरित्रे नसून ती प्रत्येकाने बोध घेण्यासाठीचा आदर्श वस्तूपाठ आहे. तसेच  महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती म्हणजे फक्त इतिहासाची उजळणी नसून आज वर्तमानात कसे जगावे आणि भविष्य कसे असावे याचा मूलमंत्र आहे असे काकडे यावेळी म्हणाले.

NCP : पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत

याप्रसंगी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रमोद बोराडे तसेच प्रा.आर आर डोके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी जयंती कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संदीप भोसले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.