Talegaon : जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे साखळी उपोषण सुरू

एमपीसी न्यूज – जनरल मोटर्स कंपनी बंद पडल्यानंतर (Talegaon) त्यात काम करणाऱ्या सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार गेला आहे. जनरल मोटर्स प्लांट हुंडाई कंपनीने घेतला असून त्या कंपनीत जनरल मोटर्सच्या कामगारांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी जनरल मोटर्सच्या कामगारांकडून साखळी उपोषण केले जात आहे. या साखळी उपोषणाची सुरुवात आज (सोमवार, दि. 2) पासून पुणे-मुंबई महामार्गावरून तळेगाव एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडवर करण्यात आली आहे.

तळेगाव येथे असलेला जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीचा प्रकल्प हुंडाई कंपनीला विकला आहे. हा करार होत असताना जनरल मोटर्स कंपनीमध्ये सुमारे एक हजार कामगारांना नवीन येणाऱ्या हुंडाई कंपनीमध्ये पुनर्वसित केले जात नाही. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियनने शासनाकडे पाठपुरावा केला असता शासनाकडून या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही.

महाराष्ट्र राज्य कामगार कृती समिती व श्रमिक एकता महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर पासून जनरल मोटर्स युनियन द्वारे एक हजार कामगारांच्या प्रश्ना संदर्भात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Alandi : राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने एमआयटी महाविद्यालायातर्फे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

नवीन येणाऱ्या हुंडाई मोटर्स कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवाशर्तीसह नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात. एक हजार कामगार व त्यावर अवलंबून असणाऱ्या पाच हजार लोकांचा निर्माण झालेला जीवन मरणाचा प्रश्न सोडविल्याशिवाय हुंडाई मोटर्सला सरकारने कोणतीही परवानगी देऊ नये.

दोन्ही कंपन्यांचा खरेदी विक्रीचा करार होत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी वेळ दिला होता. मात्र कामगारांच्या (Talegaon)  प्रश्नावर शासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नासाठी लवकरात लवकर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी संघटनेकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.