Bhosari : कंपनीमधून साहित्य चोरणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज – कंपाउंड वॉल वरून येत (Bhosari) कंपनीतील साहित्य चोरणाऱ्या एकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.23) पहाटे एमआयडीसी भोसरी येथील बिट्स कंट्रोल अँड सोल्युशन कंपनी येथे घडली.

याप्रकरणी तीर्थराज सिताराम यादव (वय 50, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी रवी सुरेश पवार (वय 19, रा.मोशी) याला अटक केली असून त्याचा साथीदार रोहन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी बिट्स कंट्रोल अँड सोल्युशन या कंपनीची कंपाउंड वॉल चढून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी तेथील 15 मीटर लांबीचा मेल फिमेल नोझल असलेला ब्रास कम्प्लिंग हॉर्स पाईप हा 5 हजार रुपयांचा पाईप चोरून नेला.

Asian Games 2023 : आशियाई 19 व्या क्रीडा स्पर्धेत भारताने मिळवले पहिले गोल्ड मेडल

यावेळी पळून जात असताना रवी पवार याला कंपनीच्या मागील बाजूस सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतला व पोलिसांच्या हवाली (Bhosari) केला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.