Bhosari : शाळेला पुस्तक विक्री करताना पुस्तक कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शाळेला पुस्तक विक्री करत असताना  पुस्तक कंपनीच्या कर्मचाऱ्याने ( Bhosari) पुस्तक विक्रीत अपरातफर कंपनी ची दोन लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना 31 मार्च 2023 रोजी भोसरी येथील एस.पी.जी.इंटरनॅशनल स्कूल येथे घडली आहे.

याप्रकरणी स्वरुप सरोज मुखर्जी (वय 38 रा. बावधन ) यांनी मंगळवारी  (दि.16) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कय्यूम अब्दुल चौघुले (रा.रायगड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Parth Pawar : पार्थ पवार यांनी राम भक्तासोबत घेतला महाप्रसादाचा आस्वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा प्रोलियम लर्निंग सोल्यूशन प्रा.लि. या दिल्ली येथील कंपनीत काम करत होता. त्याने कंपनीमार्फत  एस.पी.जी.इंटरनॅशनल स्कूल येथे  5 लाख 34 हजार 620 रुपयांच्या पुस्तकांची विक्री केली. मात्र कंपनीच्या खात्यावर संपूर्ण पैसे न पाठवता केवळ 3 लाख 36 हजार 620 रुपये देत कंपनीची 1 लाख 98 हजार रुपयांची फसणूक केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलीस पुढील तपास करत ( Bhosari) आहेत.

Punawale : महामार्गावर अचानक कार थांबवल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची  धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.