Punawale : महामार्गावर अचानक कार थांबवल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची  धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – महामार्गावरून जाणारी कार अचानक थांबवल्याने ( Punawale)  पाठीमागून येणारी दुचाकी कारला धडकली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.15) पुनावळे येथे बेंगलूर-मुंबई महामार्गावर घडला आहे.

सचिन शंकर नरुटे (वय 40 रा.वाकड) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून रावेत पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विष्णू चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे., यावरून अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : कोयत्याने गाडीची व मेडीकल शॉप ची तोडफोड करत मेडीकल चालकास मारहाण, आरोपी अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सचिन नरुटे हे त्यांच्या दुचाकीवरून बेंगलोर-मुंबई महामार्गावरून जात होते. यावेळी समोर जाणारी कार वेगात जात असताना अचानक थांबवली. यावेळी फिर्यादी यांना अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी जोरात आरोपीच्या कारला धडकली. .यामध्ये त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर जखम झाली. यावेळी आरोपीने  तिथे  न थांबून सचिन यांना वैद्यकीय मदत न करता तेथून पसार झाले. यात सचिन यांचा मृत्यू झाला. यावरून रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस कार चालकाचा शोध घेत ( Punawale) आहेत.

 

Pimpri : ‘मूकनायक’ महानाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांनी अनुभवला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा इतिहास

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.