Bhosari : कोयत्याने गाडीची व मेडीकल शॉप ची तोडफोड करत मेडीकल चालकास मारहाण, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज –  काठ्या व कोयत्याने परिसरात दहशत निर्माण करत टोळक्याने ( Bhosari ) गाडीची व दुकानाची तोडफोड करत मेडीकल चालकास देखीलमारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.15) भोसरी येथील महात्मा फुले नगर येथे घडली आहे.
याप्रकरणी धिरज राजीव कांदे (वय 29 रा.पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून पोलिसांनी चेतन महेंद्र मनोहर (वय 19 रा.भोसरी)   मुआज फिरोज मुजावर (वय 19 रा. भोसरी), जावेद इब्राहीम जावळे (वय 19) अजय नागेश कांबळे (वय 19) यांना अटक करण्यात आला आहे.

 

Pimpri : ‘मूकनायक’ महानाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांनी अनुभवला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा इतिहास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मेडीकलवर काम करत असताना आरोपी तेथे आले व त्यांनी मेडिकल समोर उभा असलेली कारच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून काठीने मारहाण केली. मेडिकलच्या काऊंटरच्या काचा फोडून त्यातील दीड हजार रुपये काढून घेतले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत ( Bhosari ) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.