Pune : ससून रुग्णालयातील डॉक्टरांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करा- रवींद्र धंगेकर

पत्राद्वारे पुणे पोलीस आयुक्तांकडे केली मागणी

एमपीसी न्यूज – ड्रग्ज  माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे ( Pune) गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी  काल ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागितली. मात्र, डीननी ही माहिती देण्यास नकार दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी डीनच्या केबिनमध्येच ठिय्या मांडला. डीननी माहिती न दिल्याने धंगेकर यांनी ससूनच्या कारभाराबाबत सुनावले. त्यामुळे उपचाराच्या नावाखाली ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मदत करणाऱ्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करा,अशी मागणी धंगेकर यांनी पत्राद्वारे पुणे पोलीस आयुक्तांकडे केली.

Maharashtra : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 1720 कोटी निधी

आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालयात भेट दिली. त्यांनीससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर  यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाबाबत विचारणा केली. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील याने रुग्णालयातून पलायन ( Pune) केल्याप्रकरणी प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी विचारली.

 

पाटील याला कुठले आजार होते आणि त्याच्यावर नऊ महिने ( Pune) कोणते उपचार केले, याबद्दल चौकशी धंगेकर यांनी केली. तसेच, दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल न करण्याचे कारणही त्यांनी विचारले.

यावर अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने रुग्णावर कुठले उपचार सुरू आहेत, याबाबत कायद्याने माहिती देता येऊ शकत नाही, असे कारण त्यांनी सांगितले. डॉ. ठाकूर यांच्या उत्तरामुळे धंगेकर संतापले. या प्रकरणात दोषी असणाऱ्या दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत तेथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ससूनवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र इथे गुन्हेगारांना व्हीआयपी उपचार आणि सर्वसामान्य रुग्णांना त्रास दिला जातो. ललित पाटील प्रकरणी दोषी असलेल्या डॉक्टरांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. हा सर्व प्रकार गंभीर असून, अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार ( Pune) असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.