India News : पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय सागरी युद्ध सरावात युद्धनौका ‘सह्याद्री’चा सहभाग

एमपीसी न्यूज – भारतीय नौदलाच्या हिंद प्रशांत क्षेत्रात तैनात ( India News ) असलेल्या स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सह्याद्री या युद्धनौकेने 20 – 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल (RAN) आणि इंडोनेशियन नौदल यांची जहाजे आणि विमानांसमवेत झालेल्या पहिल्या त्रिपक्षीय सागरी भागीदारी सरावात भाग घेतला.

 

Pune : दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्या जन्म शताब्दी निमित्त पुणे सोहळा; देव आनंद यांचे गाजलेले चित्रपट पाहण्याची पुणेकरांना संधी

या त्रिपक्षीय सरावाने तीन सागरी राष्ट्रांना त्यांची भागीदारी मजबूत करण्याची तसेच हिंद – प्रशांत क्षेत्राला स्थिर, शांततापूर्ण आणि सुरक्षित करण्यासाठी या देशांची सामूहिक क्षमता सुधारण्याची संधी दिली. या सरावाने सहभागी नौदलांना एकमेकांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा लाभ घेण्याची संधीही उपलब्ध करून दिली. नौदलकर्मींच्या प्रशिक्षणासाठी आणि परस्पर समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने जटिल सामरिक आणि पावित्रात्मक कसरती, क्रॉस-डेक भेटी आणि हेलिकॉप्टरचे क्रॉस-डेक लँडिंग सारखे उपक्रम आयोजित केले गेले होते.

आयएनएस सह्याद्री हे स्वदेशी बनावटीचे आणि प्रोजेक्ट-17 क्लास मल्टीरोल स्टेल्थ फ्रिगेट्स अंतर्गत निर्मित तिसरे जहाज मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेड येथे बांधले गेले असून कॅप्टन राजन कपूर याचे नेतृत्व करत ( India News ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.