Pimpri : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रगीत सुरू करा, मनसेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेसह सर्व क्षेत्रीय (Pimpri) कार्यालयात 2022 पासून दररोज राष्ट्रगीत म्हटले जाते. मात्र, महापालिकेच्याच मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दररोज राष्ट्रगीतच होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष रूपेश पटेकर यांनी केली आहे.

India News : पहिल्या भारत-इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया त्रिपक्षीय सागरी युद्ध सरावात युद्धनौका ‘सह्याद्री’चा सहभाग

याबाबत पटेकर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहर कामगार नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वास्तव्यास आहे.महापालिकेने कामगारांची मुले शिकावेत म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करून विविध कोर्स उपलब्ध करून दिले आहेत.

गेल्या काही वर्षापासून या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पास होऊन नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. मोरवाडी आयटीआय येथे राष्ट्रगीत म्हटले जात नाही. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व शिक्षण देणाऱ्या संस्थेला भारत सरकारने राष्ट्रगीत हे अनिवार्य केले आहे. प्राचार्य आणि शिक्षकांना स्वतः भेटून सांगून देखील वेगवेगळी कारण देऊन राष्ट्रगीत म्हटले जात नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेसह सर्व क्षेत्रीय कार्यालयात ऑगस्ट 2022 पासून दररोज राष्ट्रगीत म्हटले जात आहे. महाराष्ट्रातील दररोज राष्ट्रगीत होणारी पहिली पालिका ठरली आहे. याबाबत पटेकर म्हणाले की, महापालिकेच्या आयटीआयचे शिक्षक कोणत्या विद्युत यंत्रणेची वाट पाहत आहेत ते समजायला तयार नाही.

प्रत्येक वेळेस विद्युत विभागाने सिस्टीम बसून दिली नसल्याने राष्ट्रगीत सुरू झाले नसल्याचे सांगत आहे. ही लाजिरवाणी बाब आहे. याकडे आयुक्त सिंह यांनी लक्ष देऊन प्रशिक्षण संस्थेत त्वरित राष्ट्रगीत सुरू (Pimpri) करावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.