PCMC : महापालिकेच्या वाहनांवर आता ‘मेस्को’चे चालक

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांतील (PCMC)  कामकाजासाठी तसेच, अधिकार्‍यांसाठी वाहनचालक नसल्याने कामांना विलंब होत आहेत. तसेच, दैनंदिन कामकाजाचा खोळंबा होत आहे. कामकाज सुरळीत होण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडून (मेस्को) 60 वाहनचालक दोन वर्षांसाठी मानधनावर घेतले आहेत. त्यासाठी 8 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Pimpri : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रगीत सुरू करा, मनसेची मागणी

विविध विभागांनी मागणी केल्यानुसार महापालिकेच्या यांत्रिक विभागाने मेस्कोचे 60 वाहनचालक मानधनावर घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या वाहनचालकांना महिन्यातील 26 दिवसांचे वेतन, महागाई भत्ता फरक, अतिकालीन भत्ता देण्यात येणार आहे.

वाहनचालकास दर महिन्यास 34 हजार 446 रूपये मानधन दिले जाणार आहे. मेस्कोकडून 60 वाहनचालक नेमण्यास तसेच, त्याच्यावरील 2 वर्षांच्या वेतनाच्या एकूण 8 कोटी खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची (PCMC)  मान्यता दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.