Alandi : गाव तिथे ग्रंथालय चळवळ अधिक वृंदीगत करणार- उमेश पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय सेलची आढावा बैठक

एमपीसी न्यूज – गावगावच्या ग्रंथालयांना (Alandi) पुन्हा एकदा नवीन उभारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय सेलच्या वतीने गावोगावी आढावा व बैठका घेतल्या जात असून येत्या काळात गाव तिथे ग्रंथालय चळवळ अधिक वृंदीगत करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग प्रदेशा अध्यक्ष  उमेश पाटील यांनी व्यक्त केले.

PCMC : महापालिकेच्या वाहनांवर आता ‘मेस्को’चे चालक

चिंबळी (ता.खेड) येथे  ग्रंथालय विभागची आढावा बैठक पार पडली यात पाटील बोलत होते.यावेळी अमळनेर,धुळे येथे झालेल्या राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय अधिवेशन मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या हस्ते  संभाजी धोंडीबा अवघडे यांना शरदचंद्रग्रंथ मित्र पुरस्कार मिळाल्या बद्दल बैठकीत त्यांचा सन्मान करण्यात आला . तसेच त्यांची पुणे जिल्हाअध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग राज्याच्या समन्वयक रीताताई बाविस्कर,बाजरी समितीचे माजी सभापती विलास कातोरे , माजी सरपंच अर्जुन अवघडे,विद्यमान उपसरपंच  राहुल चव्हाण,महात्मा गांधी तंटामुक्त समिती उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संदीप जैद,उद्योजक चांगदेव कड , प्रशांत पिरूंगुटे, जिल्हा ग्रंथालय विभागचे निरीक्षक युसुफ खान आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले.याबाबत माहिती श्रीकांत बोराकवे यांनी (Alandi) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.