Pimpri Chinchwad University : एआय मुळे रोजगार, उद्योगाच्या नवीन संधी – डॉ. दीपक शिकारपूर

पीसीयुमध्ये आयटीतील विविध संधींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉकचेन यांसारख्या आधुनिक, विकसित तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचे नवीन दालन खुले झाले आहे. विकसित तंत्रज्ञान विविध उद्योगांना नवी दिशा व आकार देत आहे. यामुळे रोजगार, स्वयं रोजगार आणि उद्योगाच्या नवीन संधी निर्माण ( Pimpri Chinchwad University ) झाल्या आहेत, असे मत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.

Pune : अग्निशमन दलाकडून अग्निसुरक्षित गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन

पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘उदयोन्मुख ट्रेंड्स आणि करिअरच्या संधी’ या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत डॉ. दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माहिती तंत्रज्ञानाच्या गतिमान क्षेत्राची माहिती पिंपरी चिंचवड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना समजावून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. शिकारपूर यांनी संवाद कौशल्याचे महत्त्व, इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना स्वत:चे संवाद कौशल्य वाढवण्यास सांगितले. वेळेचे व्यवस्थापन, त्याचे फायदे आणि त्यामुळे आपली उत्पादकता कशी सुधारू शकते या विषयावर मार्गदर्शन केले. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, आयटी कन्सल्टिंग अशा विविध शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध भूमिकांवर चर्चा केली. समस्या सोडवण्यासाठी आणि करिअरच्या विकासासाठी बहु-अनुशासनात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे यावर डॉ. शिकारपूर यांनी भर दिला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्रकुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वागत डॉ. गिरीश देसाई यांनी केले. डॉ. अंजू बाला यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक ( Pimpri Chinchwad University ) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.