Lonavala : सराईत मोबाईल चोर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – लोणावळा हे देशात अतिशय सुंदर व थंड वातावरणाचे पर्यटन स्थळ असल्याने (Lonavala ) देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक फिरण्यासाठी येतात.अशा पर्यटनाच्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रमाण खूप वाढले होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी लोणावळा विभागात काम करणाऱ्या
LCB टिमला सूचना व मार्गदर्शन केले.

त्यानुसार टिमने तांत्रीक विश्लेषण व गोपनीय माहीती काढून समांतर तपासास सुरुवात केली.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टिमने सापळा रचून आकाश भरत धोत्रे (वय 21 वर्षे रा वळकाई वाडी, कुसगाव, लोणावळा,पुणे ) यास ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता लोणावळा भागात मोबाईल चोरी करत असल्याचे त्याने कबूल केले आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Pimpri Chinchwad University : एआय मुळे रोजगार, उद्योगाच्या नवीन संधी – डॉ. दीपक शिकारपूर

सदरची कामगिरी ही मा. अंकित गोयल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच मा.मितेश घट्टे अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मा सत्यसाई कार्तीक सो (IPS) उपविभागीय अधिकारी लोणावळा विभाग ,पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा ,  सिताराम डुबल लोणावळा शहर, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली   नेताजी गंधारे, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश वाघमारे, राजु मोमीन,  अतुल डेरे,  प्राण येवले, फौजदार कदम, संदीप मानकर, शिंदे, मुलाणी या  पथकाने (Lonavala )केली आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.