Pimpri : महापालिका ‘या’ मोक्याच्या जागा देणार पार्कींगसह ‘कमर्शिअल’ वापरासाठी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका जुनी (Pimpri ) भाजी मार्केट, क्रोमा शेजारील आणि चिंचवड स्टेशन येथील मोक्याच्या तीन जागा खासगी  संस्थांना पार्कींग आणि ‘कमर्शिअल’ वापरासाठी बीओटी तत्वावर देणार आहे. ही जागा 30 वर्षांसाठी देण्यात येणार असून खासगी संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत.

याबाबतची माहिती देताना सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले की, पिंपरी पुलाशेजारील जुनी भाजी मार्केट आरक्षण क्रमांक 136 असून जागा 5600 स्व्केअर मीटर आहे. क्रोमा शेजारील आरक्षण क्रमांक 117 येथील 2487.15 स्व्केअर मीटर आणि चिंचवड रेल्वे स्टेशन येथील आरक्षण क्रमांक 186 येथील 3910.53 स्व्केअर मीटर जागेवर पार्किंगचे आरक्षण आहे.

Ghorvadeshwar Hill : घोरावडेश्वर डोंगरावर पाण्यात पडलेल्या गायीला बाहेर काढण्यात यश

याठिकाणी पार्किंग निर्मितीसाठी तीनवेळा निविदा मागविली होती. पण, जागा, डिझाईन, वाणिज्य वापर नसल्याने तीनही वेळेस ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नव्याने प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. त्यात यांत्रिकी पद्धतीने पार्किंग, वाणिज्य (व्यावसायिक) वापर आणि  500 मीटर परिसरातील जागेवरील नो-पार्कींगवरही ठेकेदारी संस्थेचे नियंत्रण राहील अशी सुधारणा केली आहे.

मल्टी लेव्हल पार्किंग कम ‘कमर्शिअल’ डेव्हलपमेंट सुविधेचे डिझाईन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट आणि हस्तांतरण यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. बीओटी’ तत्वावर (बांधा, वापरा आणि हस्तांतर करा)  जागा विकसित करता येणार आहे. संस्थेला 30 वर्षांसाठी जागा दिली जाणार आहे.  युडीपीसीआर नियमाधीन बांधकाम करावे लागणार आहे. त्यामध्ये पार्कींगची संख्या ठरवून देण्यात येणार आहे. उर्वरित जागेचा व्यावसायिक कारणासाठी वापर करता येणार आहे. उत्पन्नाचा जास्तीतजास्त वाटा देणाऱ्यालाच प्राधान्य दिले जाणार (Pimpri ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.