Dehugaon : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने तरुणाने गळफास घेत संपवले जीवन

एमपीसी न्यूज – शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने एका तरुणाने (Dehugaon) गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी (दि. 6) देहूगाव येथे घडली.

नितिन चंद्रभान परदेसी (वय 24, रा. माळीनगर, देहूगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

Pimpri : महापालिका ‘या’ मोक्याच्या जागा देणार पार्कींगसह ‘कमर्शिअल’ वापरासाठी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नितिन हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत होते. मात्र त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान सहन न झाल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी नितिन यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.

त्यात त्यांनी कोणालाही दोष दिला नाही. मयत नितिन यांच्या भावाचा पोलिसांनी (Dehugaon) जबाब घेतला आहे. त्यांनीही कोणावरही संशय व्यक्‍त केलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.